राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांना खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर..
परळी वार्ताहर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांना खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. जलालपूर भागातील साबळे कुटुंबासोबत वाद झाला होता या प्रकरणाशी कसलाही संबंध नसणारे व ज्या वेळेला हे प्रकरण घडले त्यावेळी परळी पासून 40 किलोमीटर अंतरावर पक्षाच्या शेतकरी संवाद यात्रेत सहभागी असलेले परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांच्यावर राजकीय द्वेषातून दहशतवाद माजवणाऱ्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांनी पोलिसांना हाताशी धरून खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला होता.
त्या गुन्ह्यातून अंबाजोगाई सेशन कोर्टाने तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांना शुक्रवार दि 18 ऑक्टोबर 2024 रोजी अंतरीम जामीन मंजूर केला आहे. परळी वैद्यनाथ येथे गुंडागर्दी, दहशतवाद, अन्याय, अत्याचाराचे अनेक प्रकरण घडत असतांना मागच्या काही वर्षांमध्ये विनाकारण खोटे गुन्हे दाखल करून परळीतील सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उठवणाऱ्या अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात असून याचाच भाग म्हणजे मागच्या काही वर्षापासून सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उठवणारे गोरगरिबांचे कैवारी परळीचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांच्यावर राजकीय द्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.हा गुन्हा पूर्णपणे खोटा असून याचे सर्व पुरावे लुगडे महाराजांकडे होते त्यामुळे त्यांना जामीन मंजूर झाला कोर्टामध्ये देवराव लुगडे महाराज यांच्या वतीने अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड अजित बापू लोमटे यांनी बाजू मांडली.
Post a Comment