बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद समर्थनात शनिवारी परळी बंद..

बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद समर्थनात शनिवारी परळी बंद..

सर्व व्यापारी बांधव, नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे-बहादुरभाई..


परळी-वै.प्रतिनिधी

बदलापुरात दोन चीमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी परळी शहर काँग्रेस वतीने शहर काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असुन शनिवार दि.24 आँगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह महाविकास आघाडीने दिली आहे या महाराष्ट्र बंदच्या हाकेला परळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी साथ देत परळी बंद पुकारला आहे तरी परळी शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे नम्र आवाहन केले आहे.


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या आदेशावरून आज परळी शहर काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची शहराध्यक्ष बहादुरभाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.या बैठकीत बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

याबैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जिवनराव देशमुख, उध्दव ठाकरे गटाचे भोजराज पालीवाल, सी.पी. एम.चे अँड अजय बुरांडे व इतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या प्रमुखांशी संवाद समन्वय साधुन महाराष्ट्र बंद मध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन या घटनेचा निषेध नोंदवून बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेचे प्रकरण फास्टट्रँक न्यायालयात चालवुन या नराधमांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी परळी बंद मध्ये सहभागी व्हावे असे काँग्रेस पक्षाच्या वितिने करण्यात आले आहे.

या बैठकीला उपाध्यक्ष सुभाषराव देशमुख, वैजनाथ गडेकर, एतेशाम खतीब, सरचिटणीस शिवाजीराव देशमुख, अनुसूचित जाती अध्यक्ष दिपक सिरसाट, कोषाध्यक्ष फरकुद आली बेग, विधान सभा अध्यक्ष रंजीत देशमुख, शेख बबु शेख बाबा, अल्प संख्याक अध्यक्ष रसुल खान, अल्प संख्याक तालुका अध्यक्ष शेख सदाम, प्रवकते बदर भाई, ओ बी सी शहर अध्यक्ष जावेद भाई शेख जावेद अदी काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

Post a Comment

Previous Post Next Post