कृषीमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेसाठी सहाय्यक संस्था केंद्र मंजूर..
श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड; या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संपर्क साधावा-सचिन मुंडे..
परळी वैजनाथ प्रतिनिधी
कृषीमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराडयांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या महिला व बाल विकास खात्याच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या एकल पालकांच्या मुला-मुलांनी व दिव्यांगांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून लाभ मिळविण्यासाठी श्री संत भगवानबाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे यांनी केले आहे. ही योजना राबविण्यासाठी संधी दिल्याबद्दल बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे तसेच ज्येष्ठ नेते वाल्मीक (अण्णा) कराड यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत एकल पालकांच्या मुली - मुलांना वयाच्या १ ते 18 वर्षापर्यंत 2, 250/- रुपये अनुदान मिळते. कोरोना काळात ज्यांचे आई-वडील वारले आहेत. अशा पालकांच्या सर्व मुली-मुलांना तर ज्यांची आई किंवा वडील यांचे निधन झाले आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेत दिव्यांग मुलांचाही समावेश आहे.
या योजनेसाठी 1 ते 18 वर्षापर्यंत एकल पालकांची मुले पात्र आहेत. राज्य शासनाच्या वतीने परळी वैजनाथ अंबाजोगाई, केज, धारूर, बीड, माजलगाव, वडवणी, आष्टी या तालुक्यातील लाभार्थी एकल पाल्यांसाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्था परळी वैजनाथ या संस्थेची सहाय्यक संस्था म्हणून निवड करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पात्र पालकांनी व पाल्यांनी संस्थेच्या परळी वैजनाथ येथील संत भगवान बाबा चौकात असणाऱ्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन मुंडे यांनी केले आहे.
या योजनेसाठी नियम व अटी पुढीलप्रमाणे..
एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत, अशा एक पालक असलेल्या मुलांना, कॅन्सर किंवा एचआयव्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना, तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना ही योजना मिळते.
■ अशा पालकांच्या कोणत्याही दोन अपत्यांना वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येकी २ हजार २५० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही अपत्यांचे स्वतंत्र फॉर्म भरावेत.
■ घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या मुलांनाही हा लाभ मिळतो. फक्त घटस्फोटित महिलांनी घटस्फोट झाल्याचे कागदपत्रांसह अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहत आहेत, त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र सादर करावे.
तसेच आवश्यक कागदपत्रे (याचा छापील अर्ज कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून घ्यावा योजनेसाठीचा विहित नमुन्यातील अर्ज, पालकाचे व बालकाचे आधारकार्ड झेरॉक्स, मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, पालकांचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला, पालकांचा रहिवासी दाखला. (ग्रामपंचायत, नगरपालिका यांचा), मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकांचे पासबुक, मृत्यूचा अहवाल (कोविडने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा अहवाल), रेशनकार्ड झेरॉक्स, घरासमोर पालकांसोबत बालकांचा फोटो. ४ बाय ६ फोटो पोस्ट कार्ड आकाराचा रंगीत फोटो (दोन मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकांचा स्वतंत्र फोटो), मुलांचे पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागणार आहेत. तसेच बीड जिल्ह्यात सर्व तालुक्यात ही योजना राबविण्यासाठी श्री संत भगवान बाबा सेवाभावी संस्थेची निवड केल्याबद्दल व संधी दिल्याबद्दल सचिन मुंडे यांनी कृषीमंत्री तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व वाल्मिक (अण्णा) कराड यांचे आभार मानले आहेत. तसेच या योजनाचा लाभ घेण्यासाठी मो.7620977940 या नंबर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment