ठेवीदारांच्या प्रश्नावर "बप्पाच्या नुसत्याच गप्पा"..

ठेवीदारांच्या प्रश्नावर "बप्पाच्या नुसत्याच गप्पा"..

"लोकसभेतील पहिल्या भाषणात ठेवीदारांचे दुःख मांडेन" बप्पांचे वचन हवेतच विरले..

संदर्भ

परळी प्रतिनिधी

बीड लोकसभा प्रचारा दरम्यान कुटेवाडी येथील भाषणात खा.बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले होते की "जिल्ह्यातील ज्या मल्टिस्टेट/पतसंस्था बुडाल्या आहेत त्यांच्या विरोधात मी भूमिका घेणार आहे. खासदार झाल्या नंतर माझ्या सहीचे पहिले पत्र आरबीआय ला लिहिणार आहे.त्यात मागणी असेल की माझ्या जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात चाहे संचालक मंडळाच्या मालमत्ता सील करा, लीलावत काढा पण ठेवीदारांचे पैसे परत करा. लोकसभेतील पहिल्या भाषणात ठेवीदारांचे दुःख मांडेन" कुटेवाडी येथे प्रचारा दरम्यान बप्पांनी दिलेले अभिवचन हवेतच विरल्याने ठेवीदारांचा हिरमोड झाला आहे.

बजरंग बप्पा खासदार झाले त्यांच्या सह्यांचे पत्र आणखी कसे बरे निघाले नसेल.?

संसदेचे अधिवेशनही पार पडले तरी बप्पा लोकसभेत ठेवीदारांच्या दुःखाबाबत काही बोलल्याचे कोणाला आठवत नाही. सत्ताधारी आणि विरोधक हे एका नाण्याच्या दोन बाजू नाही तर काय म्हणावे.?

बीड जिल्ह्यात एका वर्षात सात ते आठ मल्टी स्टेट बंद पडल्या लाखो ठेवीदारांचे पैसे बुडाले काहीजण आजाराच्या उपचाराला पैसे न मिळाल्याने मरण पावले, काहींना पैश्याच्या धास्तीने अटॅक आले, काहींच्या घरातील सदस्यांमध्ये आपापसात टोकाची भांडणे सुरु आहेत, काहींच्या लेकरांच्या शिक्षणाचे प्रश्न उभे आहेत. एवढं सगळं असताना राजकारणी मात्र आपापल्या राजकारणात धुंद आहेत. ठेवीदारांच्या  दुःखाचे यांना किंचितही देणं घेणं नाही. स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेणारे बप्प्पा सर्व राजकारण्यांपेक्षा वेगळे असतील असं वाटलं होतं परंतु तसं वाटणं फसवं असल्याचा प्रत्येय आम्हाला आला अशी ठेवीदारांमध्ये चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post